राजकीय

अभ्युदय बॅंकेवर कारवाईचा राजकिय अर्थ,घनदाट मामांना भाजपाचं थेट आमंत्रण ?

टीम द – लोकार्थ | परभणी – गेल्या काही दिवसांपुर्वी बीडचे उद्योजक कुटे गुप्रचे अध्यक्ष सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.कुटे गुप्रच्या पतसंस्थेवरील आयकर विभागाच्या कारवाईनंतर कुटे कुटुंबियांनी केलेला भाजपा प्रवेशामुळे राजकिय वर्तुळात तर्क वितर्कांना चांगलेच उधाण आले होते.

असंच काहीसं आता परभणी जिल्हात देखील घडत आहे.आरबीआयकडून जिल्हातील नामांकित अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या संचालक मंडळावर कारवाई करण्यात आली आहे.बॅंकेच्या संचालक मंडळाला १२ महिन्यांच्या कालावधीसाठी हटवले आहे.ही बॅक माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनदाट मामा यांची आहे.

गंगाखेड मतदारसंघाचे घनदाट मामा यांनी तब्बल पंधरा वर्ष अपक्षपणे प्रतिनिधित्व केले आहे.सध्या रत्नाकर गुट्टे हे रासप पक्षाकडून गंगाखेडचे आमदार आहेत.भाजपा अंतर्गत झालेल्या सर्वेक्षणात गुट्टे हे पिछाडीवर आहेत.तसेच,महादेव जानकरांनी थेट भाजपा विरोधी घेतलेली भुमिका यामुळे भाजपने सावध पावलं उचलत घनदाट मामांच्या प्रवेशासाठी आपली चक्रे केंद्रातून फिरवली आहेत.

बीडच्या कुटेंची पुनरावृत्ती गंगाखेडचे घनदाट मामा करणार असल्याची चर्चा सध्या जिल्हातील राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.त्यामुळे,गुट्टेंना नादी लावून मामांना भाजपात घ्यायचा भाजपचा मनसुबा किती यशस्वी होते हे येणारा काळच ठरवणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button