क्राईमताज्या बातम्या

‘या’ कारणामुळे गौतमी पाटीलला कोल्हापुर जिल्हात नो एन्ट्री !

टीम द – लोकार्थ | कोल्हापूर – आपल्या दिलखेचक अदांनी सर्वांना खायळ करणारी
प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटीलच्या गणेश उत्सवातील कोल्हापुरातील दोन्ही कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.येत्या 22 आणि 24 सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

याचे झाले असे की,जेव्हा गौतमी पाटीलचे राज्यात इतरत्र कार्यक्रम पार पडले आहेत.तेव्हा गर्दीमुळे राडा आणि धिंगाणा झालेला आहे.

त्यामुळे,गौतमी पाटील च्या सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा पोलिसांनी द्यावी लागते.या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळामध्ये सुरक्षेचा ताणाचे कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.त्यामुळं,कोल्हापूर जिल्ह्यात होणारे गौतमीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.गौतमीच्या कार्यक्रमासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त देऊ शकत नसल्याचेही कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button